धार्मिक सांस्कृतिक

  • हजारवाडी गावचे ग्रामदैवत लक्ष्मी देवीची यात्रा रंगपंचमी दिवशी भरते. यात्रेनिमित्त विविध स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये सायकल स्पर्धा, घोडागाडी स्पर्धा, पळण्याची स्पर्धा, बैलगाडी, स्पर्धा तसेच लोकनाटय तमाशा व कलापथक, सिनेमा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त लक्ष्मी देवीची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.
  • आजपर्यंतचे वैशिष्ट असे की, कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी जातीय दंगल व अंतर्गत भांडणे, मारामा-या झालेल्या नाहीत. दरवर्षी श्रावण महिन्यात लक्ष्मी देवीचा महाप्रसाद केला जातो. त्यादिवशी भजन, किर्तन, सोंगी भजन असे कार्यक्रम अयोजित केले जातात तसेच दर विजयादशमी दिवशी लक्ष्मी देवीची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते सोबत कुलदैवत श्री. जोतिबाच्या सासनकाठयाही असतात हनुमान मंदिर असलेने हनुमान जयंतीही मोठया उत्साहात साजरी केली जाते. कोणत्याही यात्रेसाठी आजपर्यंत पोलीस बंदोबस्ताची गरज भासलेली नाही. व मागविलेलाही नाही.
  • 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठया उत्साहाने साजरे केले जातात या राष्ट्रीय सणांना शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध कसरतीचे प्रयोग करतात.
  • इतर उपक्रम-
    • गाव जरी लहान असले तरी इतरही बरचशे उपक्रम या गावामध्ये राबविले जातात. त्यामध्ये शेतीविषयी व्याख्यान, नेत्रतपासणी शिबीर, विविध विषयांवर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.