विविध योजना

जलसिंचन योजना-

  • गावापासून ठराविक अंतरावर कृष्णानदी बारमाही वाहते नदीपासून गावापर्यंत लिप्ट इरिगेशनद्वारे पाणी आणले आहे तसेच वैयक्तिक विहिर व बोअर याद्वारे शेतीला पाणीपुरवठा केला जातो. बारा महिने जलसिंचनाची सोय असलेने गाव हिरवेगार आहे.

नळपाणीपुरवठा योजना-

  • येळावी, निमणी, नेहरुनगर, नागाव, भिलवडी स्टेशन, हजारवाडी, बुरुंगवाडी, जुळेवाडी, बेंद्री या प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. गावांतर्गत देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायतमाफर्त केली जाते. ग्रा. पं. मालकीच्या गाव विहिरीतूनही ग्रा.पं. माफर्त पाणीपुरवठा केला जातो. दोन्ही योजनेचे दोन वेळ पाणी गावाला दिले जाते. प्रत्येक महिन्याला गावातून पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात.