माहिती

शेती-

  • गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
  • गावातील संपूर्ण शेती बागायती आहे.
  • शेतक-यांचे प्रमुख पिक ऊस, द्राक्षे त्याचबरोबर सोयाबीन, भुईमूग, हरभरा, गहू ही इतर पिके घेतली जातात.

स्वच्छता-

  • स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही असते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने सातत्याने सहभाग घेतला आहे.
  • ग्रामपंचायतीमाफर्त वेळोवेळी स्वच्छता मोहिम राबविली जाते.
  • वेळोवेळी गटारींवर औषध फवारणी केली जाते.
  • सन 2005-06 मध्ये ग्रामपंचायतीच्या अनुदानातून व स्वखर्चाने प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक शौचालये बांधलेली आहेत.
  • गाव हागणदारी मुक्त झालेला आहे.
  • सन 2005-06 मध्ये हजारवाडी गावास निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला आहे.